Home क्राइम अवैध पेट्रोल पंपावर छापा; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध पेट्रोल पंपावर छापा; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

106
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंंगाबाद । पाणेवाडीतून येणाऱ्या टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल काढून त्याची अवैैध पद्धतीने िवक्री करणारा पंप आज संध्याकाळी सहा वाजता पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने उद्धवस्त केला. तिथुन ४० लाख ११ हजाराचा मालासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई माळीवाड्याच्या जवळच्या जंभाळा गावात केली. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये शेख अब्दुल्ला शेख अहेमद (वय ४५, रा. लिपानी आडगाव), साजेद खॉन साहेब खॉन (वय ३०), इलियास खॉन आजम खॉन (वय ५४) दोघेही राहणार कैसर कॉलनी, शेख जाहेद शेख हमीद शेख (वय २६, रा.बायजीपुरा), मुक्तार वजीर शेख (वय ४०, रा.बालानगर, पैठण), अश्फाक हुसेन भाई (४८, रा.लोटाकारंजा, सिटीचौक परिसर) यांचा समावेश आहे.

त्रिमुर्ती धाब्याच्या मागे होता पंप
पाणेवाडीतुन निघालेले पेट्रोल आणि डिझेल टँकरमधून गळती नावाखाली चोरी होत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांना मिळाली होती. तिथे पाळत ठेऊन पोलिसांनी आधी खबर पक्की असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांना त्रिमुर्ती धाब्याच्या पाठीमागे तो अवैध पेट्रोल पंप असल्याचे कळाले.

विशेष पथक
पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, अनिल खरात, मनोज विखनकर, विठ्ठल आडे, विजय निकम, इमरान पठाण, सय्यद शकील, विनोद पवार यांनी तो छापा टाकला.

पाणेवाडीतुन येणाऱ्या टँकरमधून काढत होते पेट्रोल
त्रिमुर्ती ढाब्याच्या पाठीमागील पेट्रोल-डिझेलची अवैध पेट्रोल पंप तयार केला होता. त्यामध्ये पाणेवाडीतून येणाऱ्या टँकरमधील पेट्रोल-डिझेल काढून घेत होते. तिथे ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी टँकर (क्रमांक एमएच-२०-डीई-६१९५) मधुन पेट्रोल काढले जात होते. पोलिसांनी पेट्रोल-डिझेलची अवैधरित्या चोरी करून विक्री करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक टँकर, स्कार्पीओ जीप क्रमांक (एमएच-१६-आर-५०२३), रिकामे ड्रम, प्लास्टीकच्या कॅन असा एकूण ४० लाख ११ हजार ५२३ रूपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here