Home क्रीडा कपिल देव यांनी मानले चाहत्यांचे आभार

कपिल देव यांनी मानले चाहत्यांचे आभार

8
0

मराठवाडा साथी
सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो पोस्ट करत मानले आभार
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि ते आता सुखरुप आहेत. कपिल देव यांचा हॉस्पिटलमधील एक फोटो समोर आला आहे ज्यात ते सुखरुप असल्याचं दिसतं आहे
कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते. या बातमीनंतर अनेक भारतीयांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. अँजिओप्लास्टीनंतर कपिल देव यांनी “मी यातून लवकरचं पूर्णपणे बाहेर येईन. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.”असे ट्विट करून त्यांच्या फॅन्सचे आभार मानले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here