Home मनोरंजन अभिनेत्री निकिता घागने परत केला दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड

अभिनेत्री निकिता घागने परत केला दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड

430
0

काही दिवसांपुर्वी मुंबईमध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ पार पडला.या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपुर अशा अनेक कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला.मात्र हा पुरस्कार शासनाकडून दिला जातो असा अनेकांचा समज आहे. मुळात तसं नसून हा पुरस्कार एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानंतर बरेच वाद झाले.आता त्यातच मॉडेल निकिता घाग ही दादासाहेब फाळके यांच्या नावाप्रमाणेच असणाऱ्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड शो विरोधात बोलली आहे . गेल्या वर्षी मिळालेला पुरस्कार तिनं परत करण्याची घोषणा केली आहे. निकिता घाग इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. त्याच्या व्यक्तिरेखेनुसार तिला २०२१ मध्येही हा पुरस्कार देण्यात आला होता.एका वेबसाइटशी बोलताना निकिता घाग म्हणाली की, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी हा पुरस्कार परत करावा. हा खोटा पुरस्कार असून यामुळं खऱ्या पुरस्काराचे पावित्र त्यामुळं जपले जात नसल्याचं तिनं सांगितलं.निकिता घागने सांगितले की, भारत सरकार चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके यांच्या नावाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रूपात करते हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहीत नाही. त्यामुळं या पुरस्कारासारख्या समान नावांच्या पुरस्कारावर बंदी घालण्याची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तिने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here