Home क्रीडा मी पूर्णपणे बरा झालोय, रोहित शर्माने सर्व चर्चांना दिला पूर्णविराम

मी पूर्णपणे बरा झालोय, रोहित शर्माने सर्व चर्चांना दिला पूर्णविराम

339
0

शारजा: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे रोहित शर्मा कधी मैदानात खेळण्यास. युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२० मध्ये गेल्या काही सामन्यात रोहित खेळला नव्हता. त्याच बरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुखापतीमुळे त्याची निवड करण्यात आली नव्हती. अखेर काल साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत रोहित शर्मा पुन्हा मैदानावर आला आणि त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला

दुखापतीमुळे रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार केला गेला नाही असे म्हटले जात होते. पण त्याच बरोबर तो फिट झाला तर संघात नक्कीच घेतले जाईल असेही सांगण्यात येते होते. रोहित जर परत येणार असेल तर केएल राहुलला उपकर्णधार करण्याची घाई कसली होती असा देखील प्रश्न विचारला जात होता. काल रोहित पुन्हा एकदा मैदानात आल्याने हे स्पष्ट झाले की तो आता फिट आहे

सनरायजर्स विरुद्धच्या लढतीनंतर रोहितने स्वत:च्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. दुखापतीमुळे दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर मैदानावर परतल्याने मी आनंदी आहे. मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा असतो. काही सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बघू कसे काय होते. हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे.पण आता BCCI वेळ सर्वांच्या नजर लागून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here