Home मराठवाडा धारूर किल्ल्याच्या डागडुजीचे निकृष्ट काम, अधिकारी -कंत्राटदारांची मिलीभगत

धारूर किल्ल्याच्या डागडुजीचे निकृष्ट काम, अधिकारी -कंत्राटदारांची मिलीभगत

शहराचे ऐतिहासीक वैभव टिकवून ठेवसाठी दूरुस्ती कामात अपहार प्रकरणी कारवाईसाठी शहरातील नागरीक, सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

494
0

मराठवाडा  साथी

किल्लेधारुर: येथील ऐतिहासिक किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चुन केलेल्या डागडूजी कामाचा बट्याबोळ करणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी किल्ले प्रेमी प्रा.विजय शिनगारे यांनी केली आहे. शहराचे ऐतिहासीक वैभव टिकवून ठेवण्यासाठी दूरुस्ती कामात अपहार प्रकरणी कारवाईसाठी शहरातील नागरीक, सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे. किल्ले धारूर शहराला ऐतिहासिक वैभव लाभलेल्या किल्ल्याचे अस्तीत्व टिकविण्यासाठी डागडूजीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या संगणमताने कंत्राटदाराने निकृष्टदर्जाच्या साहित्याचा बांधकामासाठी वापर केला. त्यामुळे दूरूस्ती कामाची अवस्था पुढे पाठ मागे सपाट अशी झाली. वर्षानुवर्ष उपलब्ध निधी अभवी दूरूस्तीच्या प्रतिक्षेत किल्ल्याच्या बहूतांशी भागाची पडझड झाली. शहरवासीयांसह, सामाजीक संघटना, किल्ला प्रेमींच्या जनरेट्यामुळे किल्ला दूरूस्ती कामासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर होऊन कामालाही सुवारत झाली. कंत्राटदाराने अधिकाऱ्यांशी संगणमत करुन ऐतिहासिक किल्ल्याच्या दूरुस्ती कामाचा पुरता बोजवारा केला. दरम्यान, दूरुस्तीच्या निकृष्ट कामा बाबात शहरातील किल्ला प्रेमींसह नागरीकांसह प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. धारुर तहसील प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने शहरातील किल्ला प्रेमींसह नागरीक, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दूरुस्ती कामांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी किल्ला प्रेमी विजय शिनगारे यांच्यासह नागरीक, संघटनांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here