Home क्राइम पुण्यामध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

पुण्यामध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

451
0

पुणे:लग्नामध्ये हुंडा न दिल्यामुळे नाराज असलेल्या पतीने पत्नीचा सातत्याने मानसिक छळ करत तिचा छळ केला. नेहमीच्या छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. रुकय्या शहानवाज शेख (२१ रा. जनता वसाहत, पुणे) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती शहानवाज कासिम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्या इतर नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्ताफ अन्सारी (४९, रा. कोथरूड, पुणे) यांनी दत्तवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. रुकय्या आणि शहानवाज यांचे मे २०२२ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आरोपी पती व त्याचे कुटुंबीय तिचा सातत्याने छळ करत होते, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here