Home महाराष्ट्र २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री , राज्यपाल यांनी केले अभिवादन

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री , राज्यपाल यांनी केले अभिवादन

460
0

मुंबई : मुंबईतील २००८ साली झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला आजपर्यंत देशातील सर्वांत मोठा हल्ला होता . या हल्ल्याने मुंबईबरोबरच संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस ,जवानांना मुंबईतील पोलीस आयुक्तालय येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांच्या पावन स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही उपस्थिती होती.

यावेळी शहिदांच्या कुटुंबाची उपस्थिती होती. यांची मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी भेट घेतली. आज संपूर्ण देशाकडून या हल्ल्यातील शहिदांना अभिवादन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here