Home औरंगाबाद नवीन वर्षात किती आहे सुट्ट्या …..

नवीन वर्षात किती आहे सुट्ट्या …..

503
0

औरंगाबाद : :नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. नव्या वर्षात किती आहेत सुट्या, सुट्याचा आनंद कसा घेता येणार जाणुन घ्या.

जानेवारी

जानेवारीचा अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. कारण जानेवारीत तब्बल १४ दिवस ‘बँक हॉलिडे’ आहे. १७ दिवस बँका सुरू राहणार आहेत. ५ रविवार, २ शनिवारसोबत विविध सणांच्या सुट्ट्या आहेत. जानेवारी महिन्यात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची एकच सुट्टी आहे. मात्र, २०२१ मध्ये २६ जानेवारी हा दिवस मंगळवारी येत आहे. म्हणून शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांना सोमवारची सुट्टी घेऊन चार दिवसांची सुट्टी घेऊन तुम्हाला फिरण्यास जाता येऊ शकते.

फेब्रुवारी
फेब्रुवारीत एकही सुट्टी नाही.

मार्च
मार्च महिन्यात दोन सुट्ट्या आहेत.
११ मार्च, गुरुवारी महाशिवरात्री, तर रविवार, २८ मार्चला होळी

एप्रिल
एप्रिल महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत.
२ एप्रिलला गुड फ्रायडे, १३ गुढीपाडवा, १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आणि २१ एप्रिलला राम नवमीची सुट्टी असणार आहे. २५ ला महावीर जयंती रविरवारी आली आहे.

मे
मे महिना
१ मे शनिवार, १२ मे रोजी ईद-उल-फितरची सुट्टी आहे, तर २६ मे रोजी बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे.

जून
जून महिन्यात एकाही सुट्टी नाही.

जुलै
जुलै महिन्यात एकच सुट्टी आहे.
बुधवारी, २१ जुलै रोजी ईद-उल जुहाची (बकरी ईद) सुट्टी आहे.

ऑगस्ट
१५ ऑगस्टला रविवार असणार आहे.
१९ ऑगस्ट रोजी शुक्रवारी मोहरमची सुट्टी आहे. तीन दिवसांच्या सुट्टीची योजना करु शकता. यावर्षी, जन्माष्टमी उत्सव सोमवारी, ३० ऑगस्टला आहे.

सप्टेंबर
सप्टेंबरमध्ये एकही सुट्टी नाही.

ऑक्टोबर
दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. गुरुवारी, ७ ऑक्टोबर रोजी अग्रसेन जयंती आहे. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी दसरा हा सण आहे. या आठवड्यातही आपण तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारच्या दिवशी ईद-ए-मिलाद आहे, तर २० ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिकी जयंती बुधवारी आली आहे.

नोव्हेंबर
दिवाळी गुरुवारी, ४ नोव्हेंबरला असणार आहे. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस सुट्टी घेवून छोट्या टूरची योजना करू शकता. २५

डिसेंबर
डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी शनिवार आहे.

काही सुट्या शनिवार आणि रविवार या दिवशी असल्या तरी, काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. नवीन वर्षात सुमारे १० लाँग विकेंड येणार आहे. तर, ९ वेळा या सुट्ट्या नेमक्या आपल्या सुट्ट्यांच्या दिवशी येणार आहेत.

शनिवारी येणाऱ्या सुट्ट्या
नवीन वर्षामध्ये, २७ फेब्रुवारी (गुरुवारी, रविदास जयंती), २१ ऑगस्ट (ओणम), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस) या सुट्ट्या शनिवारी आल्या आहेत. जर, तुम्हाला शनिवार सुट्टी असेल तर, या वेळेस या सुट्ट्यांचा वेगळा आनंद घेता येणार नाही

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या
२८ मार्च (होलिका दहन), ४ एप्रिल (ईस्टर दिन), २५ एप्रिल (महावीर जयंती), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २२ ऑगस्ट (रक्षाबंधन) हे सुट्ट्यांचे दिवस रविवारी येणार आहेत.

स्थानिक सुट्ट्या
स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, गांधी जयंती, बौद्ध पौर्णिमा, ख्रिसमस, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद-उल-फितर, बकरी ईद, महावीर जयंती, मोहर्रम आणि ईद-ए-मिलाद या सुट्ट्या केंद्र सरकारतर्फे दिल्या जातात. तर, होळी, जन्माष्टमी, महाशिवरात्री, मकर सक्रांती, रथयात्रा, ओणम, पोंगल, बसंत पंचमी इत्यादी सुट्टीचा निर्णय राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here