Home अर्थकारण रेल्वे तिकीट बुक करणे झाले आज पासून सोपे…..

रेल्वे तिकीट बुक करणे झाले आज पासून सोपे…..

62
0

मराठवाडा साथी न्यूज
नवी दिल्ली : एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज दुपारी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लॉन्च करणार आहेत.रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची वेबसाईटअपग्रेड झाल्यानंतर तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगाने तिकीट बुक करता येणार आहे.आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे खाण्यापिण्यासह इतर सोयी-सुविधाही मिळणार आहेत.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी “आयआरसीटीसी वेबसाईट ही रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचं पहिलं केंद्र आहे . हा अनुभव चांगला असावा.””नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आता आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या दिशेने आहे. यासाठीच आयआरसीटीसीची वेबसाईट सातत्याने अपग्रेड करण्यासाठी आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here