Home मनोरंजन “तुझी चाहूल नवी लागती ….” गीतातून लागीर झालं जी ची जोडी...

“तुझी चाहूल नवी लागती ….” गीतातून लागीर झालं जी ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

121
0

मुंबई : मराठीतील छोट्या पडद्यावरील “लागीर झालं जी ” मधील शीतली आणि अज्या ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण या गाण्यातून आपला जलवा दाखवत आहेत.

‘सजलं रूप तुझं,रुजलं बीज नवं
उधाण वारं हसतंय
धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं
पाखरागत उडतंय…..’

या प्रेमात पडणाऱ्या ओळींतून ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं नक्कीच प्रेमाची चाहूल लावणारे आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलेवहिले गाणं आहे’एव्ही प्रॉडक्शन’ आणि ‘मराठी म्युझिक टाऊन’प्रस्तुत मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. ओंकार याआधी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आला, शिवाय ‘चंद्र झुल्यावर’, ‘तू ये साथीला’ याही गाण्यांची दिग्दर्शनाची धुरा ओंकारने साकारली. तसेच निर्माता विश्वजितचे हे मराठी सृष्टीतील दुसरे निर्मित केलेले मराठी गाणे असून याआधी त्याने ‘दिल बुद्धू’ या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here