Home औरंगाबाद औरंगाबाद मध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

औरंगाबाद मध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

556
0


औरंगाबाद : औरंगाबाद शहरात विविध भागात एकूण ७४४ पोलिस अंमलदारांचा बंदोबस्त रात्री रस्त्यांवर राहणार आहे, अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये कार्यक्रमांचे नेहमी आयोजन केले जाते. कोरोनामुळे राज्य सरकारने रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेदरम्यान संचारबंदी सुरु राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत. नागरिकांनी घरात बसूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिस दलाकडून ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये दोन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २१ निरीक्षक, १२९ उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि ७४४ जमादार, असा जवळपास ७४४ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारीही सहभागी असणार आहेत. शहरात विविध भागात फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. या दरम्यान, काही अधिकारी-कर्मचारी गस्तीवर असणार आहेत. तसेच महिला छेडछाड विरोधी पथक, ध्वनी प्रदूषण विरोधी पथक, पोस्टर-बॅनर विरोधी पथक आणि ड्रंक अँड ड्राइव्हची तपासणी करणारे पथक कार्यान्वित राहणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त (विशेष शाखा) अशोक बनकर यांनी दिली. पोलिस

आज औरंगाबाद शहरात पोलीस अशा प्रकारे राहणार आहे .
उपायुक्त २,सहायक पोलिस आयुक्त ५,पोलिस निरीक्षक २१,पोलिस उपनिरीक्षक १२९,सहायक उपनिरीक्षक, जमादार ७४४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here