Home बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे नाही…!

जिल्हाधिकारी राहुल रेखावार सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार अधिकारी बीडला पुन्हा होणे नाही…!

581
0

लेखक
केशव मुंडे

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा मागासलेला भाग म्हणून तसेच ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्याची स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे साहेब यांच्या पासून ओळख आहे.परंतु आजघडीला हाच जिल्हा बीड जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार साहेब यांच्या सावध व संवेदनशील विशेष कामामुळे नावलौकिक मिळवताना दिसत आहे.याचे मुख्य दोन कारण आहेत.
१)कोरोना काळातील अनुशासन:-
२१ मार्च २०२०ला भारतात कोरोना म्हणजेच कोविड19 मूळे लॉकडाऊन लागले.संपूर्ण भारतात सर्व काही ठप्प झाले, सर्वच जनतेच्या उरात धडकी भरवणारा हा क्षण होता.पण म्हणतात ना ज्यावेळी सगळेच घाबरलेले असतात तेंव्हा अशा काही अफलातून व्यक्ती असतात की त्या आणीबाणीच्या काळात ही जनहीत समोर ठेवून त्या परिस्थितीचा सामना मजबुतीने करतात. त्यांनाच लोक ‘योद्धा’अशी उपाधी देतात.त्यापैकीच एक म्हणजे राहुल रेखावार आहेत,कारण कोरोना नंतर च्या पुढील आठ महिन्याचा कालावधी खूप हालाकीचा असताना रेखावार यांनी खूपच सजगपणे व सावध पवित्रा घेत बीड जिल्ह्याचा सांभाळ एखाद्या ‘बाहुबली’ प्रमाणे केलेला सर्वांनीच पहिला व अनुभवला आहे.
संपूर्ण बीड जिल्हा प्रशासनातील टीम ला हाताशी घेऊन व जनताजनार्धनास विश्वासात घेऊन कोरोनाचे कठीण कालखंड परतावून लावले.त्यासाठी कधी जिल्हाबंदी,तर कधी गावपातळीवर नियोजनाचे काटेकोर पालन करून जिल्ह्यातील लोकांचे कोरोना पासून रक्षण केले.संपूर्ण महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यात कोरोनानाने हाहाकार माजवला असतांना बीड जिल्ह्यात खूपच कमी प्रमाणात याचा असर राहीला.
२)ई-पीक पाहणी कार्यक्रम:-
यावर्षी पावसाळी ऋतुमानात भरपूर पाऊस पडल्याने बीड जिल्ह्यातही ओला दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता.एकतर अगोदरच कोरोना व त्यात ओला दुष्काळ असा डबल अटॅक त्यांच्यावर झाला होता.
पण अशा मोडलेल्या व डबघाईस आलेल्या जिल्ह्याला नवसंजीवनी देण्याची गरज होती.यासाठीच ई-पीक पाहणी करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेवून व गावागावात ई-पीक पाहणी नियोजन पूर्ण राबवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा रेखावार यांनी विढाच उचलला आहे.
या सर्वात त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.तसेच जिल्ह्यातील सर्वच मंडळ आधिकारी,तलाठी,ग्रामसेवक यांच्याशी समनवय साधत त्यांनी नियोजनपूर्ण कामातून दाखवून दिलं आहे की जिल्ह्याचा प्रशासकीय आधिकारी कसा असावा.
अशाप्रकारे, जिल्ह्यापासून ते तालुक्यापर्यंत पालकमंत्री -जिल्हाधिकारी- आमदार- मंडळ आधिकारी-तलाठी-ग्रामसेवक-सरपंच व शेतकरी अशी महत्वपूर्ण साखळी तयार करून देशाच्या अन्नदात्याला व सामान्य जनतेस केंद्र शासनाची व राज्य शासनाची कशी मदत मिळेल, यावर सध्या बीड जिल्हाधिकारी यांचे पूर्ण गतीने काम चालू आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर असे लक्षात येते की, ई-पीक पाहाणी या कार्यक्रमात बीड जिल्हा हा एक नंबर वर आहे.
म्हणूनच बीड जिल्ह्यात एक अनुशासनप्रिय,सजग व सावध आधिकारी राहुल रेखावार साहेब यांची सर्वसामान्य जनता फॅन झालेली पहावयास मिळत आहे.
पण आश्या आधिकार्यास जास्त दिवस का पुढारी लोक राहुदेत नाहीत असा सवाल सर्वसामान्य जनतेतुन निर्माण होत आहे.बीड जिल्हाला राहुल रेखावारां सारखे प्रमाणिक, तत्पर, हुशार, अभ्यासु आधिकारी पुन्हा होणे नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here