Home अंबाजोगाई जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज साठे

जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे-माजी आ.पृथ्वीराज साठे

530
0

वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित देशमुख यांना निवेदन

अंबाजोगाई

जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालया मधील बदली कर्मचा-यांना सेवेत कायम करावे अशी विनंती केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंञी ना.अमित विलासरावजी देशमुख यांची बुधवार,दिनांक 20 जानेवारी रोजी मुंबई येथे भेट घेऊन आणि या विषयावर चर्चा करून दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई येथे दि.09/07/1999 रोजी दिलेल्या मा.न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सन 2000 मध्ये 19 बदली कर्मचारी यांना कायम करण्यात आले.मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत.मा.न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी होत आहे.परंतु,पुर्वी मा.संचालक यांच्या पञानुसार रिक्त असलेल्या पदावर कायम केले जात नाही.मा.न्यायालयीन आदेशानुसार तयार केलेल्या जेष्ठता यादी मधील उर्वरित 214 कर्मचारी यांना 29 दिवसांच्या तत्वावर कोरोना,सारी, महाभयंकर व इतर रोगांच्या साथी मध्ये आवश्यकते नुसार कामावर घेतले व रूग्णांची सेवा केली.1980 पासुन कार्यरत बदली कर्मचारी यांना सेवेत कायम केले नाही.हा अन्याय आहे.वेळोवेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडुन निघणा-या अटींना कंटाळुन बदली कर्मचारी आत्महत्या करून घेत आहेत.यामुळे
अंबाजोगाई येथील कर्मचारी यांची ही मानसिक स्थिती ही बिघडत चालली आहे.10 वर्षे व 240 दिवस भरले पहिजेत ही जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे या बाबत मी यापूर्वी व्यक्तीश: अनेकवेळा मागणी केलेली आहे.गेल्या 30 वर्षांपासुन बदली कर्मचारी यांची सेवेत कायम करण्याची मागणी पुर्ण करून बदली कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी विनंती माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here