Home मनोरंजन अभिनेत्री गोहर खान चा वयाने ११ वर्ष लहान डान्सर झैद दरबार सोबत...

अभिनेत्री गोहर खान चा वयाने ११ वर्ष लहान डान्सर झैद दरबार सोबत झाला साखरपुडा

600
0

मुंबई : अभिनेत्री गौहर खान हिने संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबार याच्यासोबत नुकताच साखरपुडा केला. झैद हा डान्सर आहे.विशेष म्हणजे झैद दरबार हा गौहर खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. गौहर आणि झैद यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या साखरपुड्याची बातमी सांगितली. दोघे येत्या २५ डिसेंबर ला निकाह करणार आहेत असं म्हंटल्या जात आहे. मात्र, गौहर आणि झैद यांच्याकडून निकाहच्या तारखेची अद्याप माहिती मिळालेली नाही.

गौहर खान याअगोदर अभिनेता कुशाल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती.’बिग बॉस ७’ मध्ये त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती. परंतु त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकले नाही. मोठ्या वादानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. परंतु जुन्या गोष्टी विसरुन दोघेही आता आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

https://www.instagram.com/p/CHMpgX7nOGk/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here