Home क्रीडा ऋषभ पंतच्या सरावाचे व्हिडीओ पाहून चाहते भावूक

ऋषभ पंतच्या सरावाचे व्हिडीओ पाहून चाहते भावूक

250
0


अपघातात ऋषभच्या पायाला देखील गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उभं राहाताना देखील त्रास होत होता. पण आता त्याला चालताना पाहून चाहत्यांना आनंदाला पारावारच उरलेला नाही.ऋषभ पंतनं दिले पुनरागमनाचे संकेत, सराव करतानाचा व्हिडीओ पाहून चाहते झाले भावूक झाले ऋषभ पंत हा टीम इंडियामधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तर चाहत्यांना त्याची सातत्यानं आठवण येत होती. पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या कार अपघातामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ऋषभचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो चक्क पाण्यात चालण्याचा सराव करताना दिसतोय. अपघातात ऋषभच्या पायाला देखील गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उभं राहाताना देखील त्रास होत होता. ऋषभनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो स्विमिंग पूलमध्ये चालण्याचा सराव करताना दिसतोय. त्याच्या हातात एक काठी आहे अन् तो हळूहळू पावलं पुढे टाकतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लवकरच टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार असे संकेत दिले आहेत. अगदी काही मिनिटांटाच शेअर करण्यात आलेला या व्हिडीओला ५० हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. ऋषभला चालताना पाहून चाहते भावूक झाले अन् त्यांनी लवकरात लवकर ऋषभला तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here