Home मनोरंजन तरुणाच्या हातातून मोबाइल घेऊन पोपट उडाला ; कॅमेरा होता सुरु आणि पुढे….पहा...

तरुणाच्या हातातून मोबाइल घेऊन पोपट उडाला ; कॅमेरा होता सुरु आणि पुढे….पहा मजेशीर दृश्य.. Video

4113
0

Marathwada Sathi : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ड्रोन नव्हे चक्क पोपटाने मोबाईलमध्ये कैद केले शहराचे विहंगम दृश्य. या व्हिडीओत एका पोपटाने चक्क तरुणाच्या हातातून कॅमेरा सुरु असलेला मोबाईल हिसकावून आकाशात झेप घेतली. यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यात अतिशय मजेशीर दृश्य कैद झाले आहे. या व्हिडीओत पक्ष्याच्या नजरेतून जग कसे दिसते ते अनुभवण्याची संधी मिळाली आहे. व्हायरल व्हिडीओत एक तरुण पोपटाच्या मागे धावताना दिसतो आहे. हा पोपट तरुणाच्या हातातून चक्क मोबाइल घेऊन उडून गेला आहे. या मोबाइलमध्ये पोपटाने पॅनारोमिक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये हवेतून जमिनीवरील दिसणारे विहंगम दृश्य आणि हवेचा आवाज, उडणाऱ्या पोपटाची सावली स्पष्टपणे दिसते आहे. शहरातून उडत असताना घरे, रस्ते दिसत आहेत. हा पोपट एकेजागी क्षणभर थांबला देखील होता. तेव्हा लोकांनी त्या पोपटाला हाक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो पुन्हा हवेत उडू लागला.

हा व्हिडीओ संपतो तेव्हा पोपट एका कारवर बसलेला दिसतो.

हा व्हिडीओ ट्विटवर Fred Schultz या अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. सध्या हवेतून जमिनीवरचे दृश्य चित्रित करण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. पण, या पोपटाने कमालच केली आहे. जीवंत पोपट सगळ्यागोष्टी कॅमेऱ्यात कैद करतो हे अद्भुत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here