Home क्रीडा भारत vs ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना उद्या

भारत vs ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना उद्या

251
0

शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत समोरासमोर येणार आहे. पहिला सामना मुंबईत होणार . तीन वर्षांनंतर भारतीय भूमीवर दोन्ही देशांमधली ही पहिली वनडे मालिका असेल. अन्य दोन सामने विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणार आहे.

वानखेडे स्टेडियमवरील सामन्याने सुरू होणारी आगामी मालिका ही दोन्ही संघांसाठी वनडे विश्वचषकाची तयारी आहे. वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे.

कारण या मालिकेनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. याशिवाय भारत वेस्ट इंडीजमध्ये ३ वनडे खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत ५ वनडे खेळेल. म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत संघांना प्रयोग करण्याची संधी मिळणार असून सप्टेंबरमध्ये संघाला विश्वचषकत उतरणार आहे..

पहिल्या वनडेतून रोहित बाहेर, हार्दिक पांड्या कर्णधार मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा व्यक्तीगत करणामुळे तो उपलब्ध नसणार . तो दुसऱ्या सामन्यात संघात परतेल. त्याच्या जागी हार्दिक पंड्या कर्णधार असणार . श्रेयस अय्यरला दुखापतीमुळेबाहेर करण्यात आले आहे.

भारत सध्या आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यात यशस्वी ठरले तर भारताचे नंबर – १ चे स्थान धोक्यात येणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here