Home मनोरंजन अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्डसाठी भावुक

अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्डसाठी भावुक

132
0

मुंबई : सुशांतसिंह राजपूतची दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी म्हणून अंकिता लोखंडेकडे पाहिलं गेलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे सुरु झालेला त्यांचा प्रवास व्यक्तिगत जीवनातही सुखकर बनला. अनेक वर्षं हो दोघे एकत्र राहात होते. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानतर पुन्हा एकदा अंकिता लोखंडेचं नाव चर्चेत आलं. एकीकडे सुशांतच्या मृत्यूचं गूढ वाढत असतानाच सुशांतसोबत राहणाऱ्या रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं. तेव्हा अंकिताने केलेले ट्वीट्स, इन्स्टा पोस्टही चर्चेत आल्या. सुशांतच्या जाण्यानंतर अंकिताही सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं टाळू लागली. या सगळ्या प्रकरणात अंकिताचा रोख हा रियावर होता हे अप्रत्यक्षरित्या सिद्ध झालं होतं. पण यात अंकिताने आपलं व्यक्तिगत आयुष्य यात येऊ दिलं नव्हतं. जसं अंकितापासून वेगळं झाल्यावर सुशांतसिंहने आपले संबंध रिया चक्रवर्तीसोबत जोडले. तसे अंकितालाही नवा जोडीदार मिळाला. त्याचं नाव विकी जैन आहे.

सुशांत गेल्यानंतर इतका काळ उलटून गेल्यानंतर अंकिताने विकीला उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यात आपल्याला विकी गवसल्याबद्दल देवाचे आभार मानतानाच तूच कसा माझ्या आयुष्यातला सोलमेट आहेस असंही तिने सांगितलं आहे. शेवटी, या सगळ्या प्रकरणात तुलाही अनेकदा स्पष्टीकरणं द्यावी लागली. काहीवेळी टीका झाली.. खरंतर तुझा त्याच्याशी संबंध नव्हता पण तरीही तू ते मोठ्या मनाने स्वीकरालं आणि त्याच्याशी दोन हात केलेस. याबद्दलही तिने विकीचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CHFE453BR_J/?utm_source=ig_web_button_share_sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here