Home आरोग्य जायफळ करेल तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी

जायफळ करेल तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी

236
0

त्वचेवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी काय करावे? जायफळ वापरुन त्वचेवर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी हे उपचार करुन बघा. जायफळ अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे ज्यामुळे त्वचेतील रंगद्रव्य कमी होते.

जायफळ ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे जी जेवणात मसाला म्हणून वापरली जाते. पण, जायफळाचे त्वचेसाठी काही खास फायदे आहेत. खरं तर, जायफळ त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करू शकते आणि त्वचेच्या पेशींमध्ये हायड्रेशन वाढवण्यास मदत करते. तसेच, ते कांजीण्यांचे फोड आणि मुरुमांचे डाग कमी करू शकते. याशिवाय, त्याचे अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी, मुरुम आणि बंद झालेल्या छिद्रांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. जायफळ वापरुन सुरकुत्या घालविण्यासाठी उपचारपद्धती

जायफळ आणि दूध चेहऱ्यावर लावा
तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी जायफळ प्रभावी आहे. यासाठी जायफळ बारीक करून दुधात मिसळून चेहऱ्याला लावावं लागेल. थोडा वेळ इथेच राहू द्या आणि हलक्या हातांनी मसाज करा. मग असंच ठेवून द्या. आता थंड पाण्याने चेहरा धुवा.

जायफळ आणि मधाचा फेस पॅक
जायफळ आणि मधाचा फेस पॅक सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण हे मिध्रांत चेहऱ्याचे हायड्रेशन वाढवण्याचे काम करते आणि त्वचेला आतून चमक आणते. तसेच मध तुमच्या त्वचेला आतून दुरुस्त करतो.आणि सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे जायफळ बारीक करून त्यात मध टाका. ते तुमच्या सुरकुत्यांवर लावा.

जायफळ आणि कोरफड
जायफळ आणि कोरफड दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर आलेल्या रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच, या दोन्ही गोष्टी हायड्रेशन वाढवण्याचे आणि त्वचेला आर्द्रता देण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त, हा उपाय कोलेजन वाढवतो आणि त्वचेची चमक वाढते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी जायफळात कोरफड मिसळून चेहऱ्याला लावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here