Home नागपूर नागपूर तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सर्व 9 ही उमेदवार विजयी

नागपूर तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे सर्व 9 ही उमेदवार विजयी

310
0

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने एकहाती विजय मिळवला आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर नरखेड तालुक्यातील 17 पैकी 16 ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.काटोल तालुक्यातील भोरगडमध्ये 9 पैकी 9 ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायतमध्ये 7 पैकी 7 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये 9 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे.

नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने नरखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत मध्ये 13 पैकी 10 जागांवर, थडपवनी येथे 9 पैकी 9 जागांवर, महेंद्री येथे 7 पैकी 6, खैरगाव येथे 13 पैकी 10, सिंजर येथे 7 पैकी 5, अंबाडा येथे 9 पैकी 7, सायवाडा येथे 9 पैकी 6 राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेनासोबत लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित 9 पैकी 9 ही जागेवर विजय प्राप्त केला आहे.तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व 9 ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here