Home क्राइम जादूटोण्याच्या संशयावरून दिव्यांगाचा खून

जादूटोण्याच्या संशयावरून दिव्यांगाचा खून

365
0

करमाडच्या दर्ग्याजवळची घटना, आरोपी अटकेत
मराठवाडा साथी न्यूज
करमाड । जादू टोण्याच्या संशयावरून एका दिव्यांगाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना करमाड शिवारातील दर्ग्यात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर आसाराम गडकर ( ४८ रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भाऊसाहेब सदू शेजवळ (रा. कुंभेफळ ता. औरंगाबाद) या आरोपीस पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.

एका पायाने अधू होते गडकर
ज्ञानेश्वर गडकर हे एका पायाने अधू होते. यामुळे ते कुबड्या घेऊन चालायचे. भाऊसाहेब शेजवळ याचा गडकर हे जादूटोणा करतात, असा संशय होता. यातून औरंगाबाद-जालना रोडपासून अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या दर्ग्याजवळ गडकर आणि शेजवळ यांच्यात बुधवारी सकाळी वाद झाला.

संशयावरून झाली होती मारामारी
त्यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर त्यांच्याच कुबडीने हल्ला केला. जबर हल्ल्यात कुबडी तुटल्यानंतर शेजवळ याने गडकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. यात गडकर जबर जखमी झाले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गडकर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

आरोपीस घटनास्थळावरून घेतले ताब्यात
घटना औरंगाबाद – जालना या मुख्य रोडपासून अवघ्या काही फुटांवर घडली. याची माहिती करमाड पोलिसांना मिळताच पेट्रोलिंगवर असलेले पोण्उ.नि. सुशांत सुतळे व चालक अजिनाथ उकर्डे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी भाऊसाहेब शेजवळ घटनास्थळीच होता. त्याने पोलिसांना पाहताच पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुतळे यांनी पाठलाग करून शेजवळला ताब्यात घेतले. घटनास्थळी करमाड पोलिस ठाण्याचे पो.नि. संतोष खेतमाळस, स.पो.नि. प्रशांत पाटील यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here