Home राजकीय दिवानों के ‘डाॅन’ प्रदीप जैस्वाल

दिवानों के ‘डाॅन’ प्रदीप जैस्वाल

477
0

दै. मराठवाडा साथी
औरंगाबाद । आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या लोकप्रियतेचे गारूड आजही शहरातील तरूणाईवर स्वार आहे. म्हणूनच 60 वर्षाच्या या तरूणावर आजही भरभरून प्रेम करणारी तरूणाई याच शहरात आहे. आजही ‘डॉन’मधील ‘ओ दिवानों मुझे पहचानों’ गाण्यावर ताल धरणारे प्रदीप जैस्वाल यांचा महापालिकेच्या प्रशासनावर प्रभाव आहे.

निष्ठावान जैस्वाल
$ शिवसेनेच्या प्रारंभापासून मधली पाच वर्ष सोडली तर प्रदीप जैस्वालांनी शिवसेनेची एकनिष्ठतेने सेवा केली. खैरेंशी असणारे संबंध आणि किशनचंद तनवाणींशी असणारे मैत्री त्यांना सदासर्वदा उपयुक्त ठरली. मग ती राजकारणात असो किंवा वैयक्तीक आयुष्यात. त्यामुळे ते नगरसेवक, महापौर, खासदार आणि आमदार होऊ शकले. त्यांच्या निष्ठाच त्यांना कामी आल्या.

प्रगती आघाडीचा कटू निर्णय
$ प्रदीप जैस्वालांनी महापालिकेच्या प्रशासनावर ‘आदरयुक्त’ दबदबा निर्माण केला आहे. त्यातूनच त्यांनी १० वर्षापूर्वी शिवसेनेने उमेदवारी नाकारून विकास जैन यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अतिशय कटू पद्धतीने शहर प्रगती आघाडीची स्थापना केली. त्यावेळी आमदार होईल की नाही, अशी शंका घेतली जात होती. पण त्यांचे संबंध असणाऱ्या दलित, मुस्लिम मतांनी त्यांना आमदार केले.

कट्टर असूनही तशी प्रतिमा नाही
$ कट्टर शिवसैनिक असूनही प्रदीप जैस्वालांना दलित, मुस्लिम समाजात मान्यता आहे. त्यांच्या या वैयक्तीक संबंधांचा फायदा त्यांना सगळ्याच ठिकाणी होतो. अगदी राजकारणातही त्यांना फायदा होतो. त्यामुळेच जैस्वालांची लोकप्रियता आजही टिकून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here