Home मनोरंजन “मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा” Coming Soon …..

“मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा” Coming Soon …..

652
0

मुंबई :२०१८ मध्ये अभिनेत्री कंगना रानौतच “मणिकर्णिका ” हा चित्रपट आला होता. आता कंगना रणौत लवकरच मणिकर्णिका रिटर्न्स या चित्रपटातही दिसणार आहे. या सिनेमाची तिने आपल्या सोशल अकाउंटवर घोषणा केली आहे.यामध्ये ती काश्मीरच्या राणीची भूमिका साकारणार आहे. याबाबत तिने ट्विट केले आहे.

कंगनाने नुकताच तिच्या ट्विटर हॅण्डलवरून मणिकर्णिका रिटर्न्स या सिनेमाची घोषणा केली आहे. कंगनाने या ट्वीटमध्ये मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ दिद्दा’ असं चित्रपटाचं संपूर्ण नाव दिलं आहे. यावरून कंगना या सिनेमात राणी दिद्दा यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे.कंगनानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे, आपला भारत देश झाशीच्या राणीसारख्या बर्‍याच वीरांच्या कथेचा साक्षीदार आहे. अशीच आणखी एक रणरागिणी म्हणजे काश्मीरची राणी जिनं महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केलं. निर्माता कमल जैन आणि मी (कंगना रणौत) लवकरच या रणरागिणीची धाडसी कथा मणिकर्णिका रिटर्न्स द लीजेंड ऑफ दिड्डा च्या माध्यमातून घेऊन येत आहोत”. दरम्यान कंगना लवकरच थलाईवी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here