Home औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा भागात अग्नितांडव:जाधव मंडपच्या गोडाऊनला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा भागात अग्नितांडव:जाधव मंडपच्या गोडाऊनला भीषण आग

504
0

अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी विझवली आग

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगरमध्ये मिटमिटा भागात काल रात्री भीषण आग लागली. यावेळी आग विझवण्यासाठी १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तब्बल दिड तासांच्या प्रयत्नांनंतर आगीला विझवण्यात यश आले.पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात रविवारी रात्री ९:५० वाजता अचानक आग लागली. यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली. सात एकरमध्ये पसरलेल्या जाधव मंडपच्या गोडाऊनला ही आग लागली होती.आग वाढत गेल्याने अग्निशमन दलाच्या १० हुन अधिक गाड्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पदमपुरा अग्निशमन दलाच्या पाच सिडको एक, चिखलठाणा एक, वाळूज एमआयडीसी, एक बजाज एक गरवारे एक ,अशा एकूण दहा अग्निशमन गाड्या बोलवण्यात आल्या होत्या.आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी आग विझवण्यात, सामान बाहेर काढण्यात मदत केली. मात्र एकापाठोपाठ एक १० सायरन वाजत येणाऱ्या गाड्यांमुळे नेमके काय झाले असेल असे म्हणत नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.छत्रपती संभाजीनगर शहरात जाधव मंडप हे नाव मंडप व्यवसायातील अग्रगण्य नाव आहे. आपले साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी मिटमिटा परिसरात ७ एकर परिसरात आपला गोडाऊन उभारला आहे. या गोडाऊनमध्ये ते मंडपाचे कापड, खुर्च्यांसह इतर साहित्य ठेवतात. त्यामुळे या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अजून नुकसानीचा आकडा समोर आलेला नाही.आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंग करण्यात आली . आज पोलिसांकडून पंचनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here