Home क्रीडा BCCI कडून टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

BCCI कडून टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

225
0

बीसीसीआयने वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. या करारत एकूण २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी असे काही खेळाडू होते ज्यांना कोणत्याही स्थान मिळालेले नाही आहे . केंद्रीय कराराच्या एकूण चार श्रेणींमध्ये एकूण २६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणी A+, A, B आणि C आहेत. बीसीसीआयच्या या केंद्रीय करारात आपल्या दमदार कामगिरीचे बक्षीस रवींद्र जडेजाला मिळाले आहे. जडेजाचा A+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत आता चार खेळाडू आहेत. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह A+ श्रेणीचा भाग होते, त्यांना या देखील त्याच श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. आता यावर्षी या श्रेणीत चौथा सदस्य रवींद्र जडेजा सहभागी झाला आहे. यापूर्वी जडेजाचा A श्रेणीत समावेश करण्यात आला होता..रवींद्र जडेजाशिवाय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही बढती देण्यात आली . हार्दिक आता श्रेणीतून A श्रेणीत आला आहे. याशिवाय अक्षर पटेलही आता A श्रेणीत आला आहे. तर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल C श्रेणीतून B श्रेणीमध्ये आले आहेत.

एकीकडे रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंना बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बढती मिळाली, तर दुसरीकडे केएल राहुलला मात्र तोटा सहन करावा लागला. राहुलला आता A मधून B श्रेणीत गेला आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरचेही नाव खाली जाणाऱ्या खेळाडूंमध्ये आले आहे. शार्दुल याआधी B श्रेणीत होता, त्याला आता C श्रेणीत टाकण्यात आले .यासोबतच बीसीसीआयने काही वरिष्ठ खेळाडूंना आपल्या कराराचा भाग बनवले नाही आहे . या यादीत अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मयंक अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे. तर संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, इशान किशन आणि केएस भरत यांचा C श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वेगवेगळी वार्षिक रक्कम दिली जाते. A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक फी मिळते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना ७ कोटी रुपये दिले जातात. A श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी तर B श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी मिळतात. तर C श्रेणीतील खेळाडूला १ कोटी दिले जातात.

A श्रेणीतील खेळाडू – हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल
B श्रेणीतील खेळाडू – लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल
C श्रेणीतील खेळाडू – शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here