Home शिक्षण पर्यटनाच्या जागृतीसाठी बिना खर्चिक भारत भ्रमण

पर्यटनाच्या जागृतीसाठी बिना खर्चिक भारत भ्रमण

235
0

जिद्द , मेहनत , चिकाटीतून आपले स्वप्न साकार करणे शक्य होते . असे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न माळेगाव ( ता. बदनापूर जि. जालना ) येथील सचिन संजय कातुरे करतोय . एकदा तरी भारतभर फिरावे अशी त्याची इच्छा होती आता तो वयाच्या १९ व्या वर्षी भारत भ्रमंती करत आहे . त्याने याची सुरुवात महाराष्ट्र राज्यातून १६ फेब्रुवारी २०२३ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून केली असून गेल्या ३४ दिवसापासून तो घरापासून दूर आहे ‌. महाराष्ट्रातील गड किल्ले महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांना तो गेल्या अनेक दिवसांपासून भेट देत आहे आणि विशेष म्हणजे तो या भ्रमंतीत स्वतःचा एक रुपया खर्च करत नाही त्याने आतापर्यंत १३०० किलोमीटरचा प्रवास बिना खर्च केलाय.

शेतकरी कुटुंबातील सचिन कातुरे यांच्या मनात भारत भ्रमणाची संकल्पना अनेक दिवसापासून होती. तो आता व्दितीय वर्षात शिकत असून शिक्षणा दरम्यानच त्यांनी या भ्रमंतीला सुरुवात केली आहे.. आणि त्याला तसं महाराष्ट्रत भरभरून प्रेम आणि प्रवासादरम्यान मदत देखील मिळत आहे. गडकिल्ल्यांना आणि ऐतिहासिक स्थळांना हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे ते आपल्यापर्यंत टिकलं हे आपलं भाग्य आहे. हजारो वर्षानंतर पुढच्या पिढींना ते फक्त कागदाच्या चित्रावर बघावे लागेल.. म्हणून मला ते बघून घ्यायचे अशी या मागची त्याची संकल्पना आहे. पर्यटन क्षेत्रातून २२ टक्के महसूल मिळत असूनही पर्यटन स्थळाचे पुरेसे गांभीर्याने जतन , संवर्धन होत नाही . दक्षिण भारतातील काही स्थळाचा अपवाद वगळता देशभर ऐतिहासिक वास्तूची खान आहे. पर्यटन क्षेत्राचा विस्तार केला तर सर्वाधिक रोजगार उपलब्ध होईल असे त्याचे वैयक्तिक मत आहे. प्राचीन वारसा,स्थळ ,जतन -संवर्धनासाठी जनजागृती करीत सचिनने नुकताच महाराष्ट्रातील १७ जिल्ह्याचा प्रवास पूर्ण केला आहे. आणि आता तो खानदेशकडे रवाना झाला आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here