Home क्राइम पोलीस भरती ट्रेनिंगचा बहाणा ; १५ वर्षाच्या बलिकेवर मानलेल्या भावाचा बलात्कार

पोलीस भरती ट्रेनिंगचा बहाणा ; १५ वर्षाच्या बलिकेवर मानलेल्या भावाचा बलात्कार

2290
0

औरंगाबाद : आईच्या निधनानंतर गेल्या अकरा वर्षांपासून निराधार झालेल्या बहिणींच्या असाह्यतेचा फायदा उचलत एका नाराधनाने नववीत शिकणाऱ्या बलिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याने त्या घटनेचा व्हिडीओ तयार करून बलिकेला धमकावले. हा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला. मात्र,बदनामीच्या भीतीने तिने वाच्यता केली नाही. अखेर काहीजणांनी त्यांना धीर देऊन पोलिसात जाण्यासाठी मदत केल्याने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी नाराधमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. रामदास रामजी प्रसाद उर्फ पल्ला असे बलात्कार करणाऱ्या नारधमाचे नाव आहे. त्याला पीडितेने राखी बांधून भाऊ मानले होते त्यानेच हे घृणास्पद कृत्य केले.
राणी (नाव बदलेले आहे) ही इयत्ता नववीत शिकते. तर तिची मोठी बहीण सोना (वय १९) ही एका रुग्णालयात नर्सचे काम करते. आईचे ११ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे दोघी एकट्याच राहतात. सोना नौकरी करून लहान बहीण राणीचा सांभाळ करते. २४ ऑगस्ट रोजी दोघी बहिणी घरी असताना रामदास व त्याचसोबत त्याचा मित्र राहुल काळे आले होते. तेव्हा रामदासने रक्षा बंधनला वेळ मिळाला नाही म्हणून मी आज राखी बांधून घ्यायला आलो आहे असे सांगून त्या दोघांनी दोघी बहिणकडून राखी बांधून घेतली. त्यावेळी रामदासने ओवाळणी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत पण मी तुला पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग देईल व आपण एक तारखेपासून ट्रेनिंग सुरू करू, मी तुला ट्रॅक सुट आणून देईल असे म्हणाला. कॉफी पिऊन दोघे निघून गेले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी रामदास घरी आला. तेव्हा राणी एकटीच घरात होती. बहीण सोना ड्युटीला गेली होती. ती साडेनऊ वाजता घरी येणार होती. त्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास रामदास घरी आला. त्यावेळी राणी घरात एकटीच झोपलेली होती. तर शेजारच्या काका काकूने घराला बाहेरुन कुलूप लावले होते. रामदासने त्यांच्याकडून चावी घेवून दरवाजा उघडला. राणीला झोपेतून उठवले. राणीला ट्रेनिंगला चल म्हणाला. त्याला पाय दुखतोय मी येत नाही असे राणी म्हणाली. त्यामुळे रामदासने तिची बहीण सोना हिला फोन लावला तेव्हा तिने राणीला पोलीस भरतीच्या ट्रेनिंग साठी त्याच्या सोबत जाण्यास सांगितले.

कारमधून मित्राच्या खोलीवर नेले

रामदासने आणलेला ट्रक सूट घालून राणी त्याच्यासोबत निघाली. चालत चालत दर्गा चौक पर्यंत गेले. पाऊस येत असल्यामुळे दोघेही आडोशाला थांबले. तेवढ्यात एका कारला रामदासने हात करून थांबवले. त्या कारमध्ये अगोदरच दोघे होते. चालकाला रामदासने अजय ठाकुर म्हणून आवाज दिला होता. कार बीडबायपास रोडने पाटीलवाडा हॉटेलच्या बाजुच्या कमानीतून आतमध्ये राजेशनगरात नेली. एका दोन मजली घराजवळ सोडून कार निघुन गेली.

खोलीत व्यायामच्या बहाण्याने केला अत्याचार

राणीला दुसऱ्यामजल्यावरील रूम मध्ये रामदास घेऊन दरवाजा बंद केला. त्याने तिला व्यायाम करण्यास सांगितले. व्यायाम करून झाल्यावर रामदासने ट्रेनिंगसाठी मालीश करावी लागते असे म्हणून तिच्यावर बलात्कार केला. त्याने मोबाईलमध्ये व्हडिओ काढला. तू जर कोणाला काही सांगितले तर मी हि व्हिडिओ फेसबुकवर टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने राणीला पावणे नऊच्या सुमारास दुचाकीवर घरी आणून सोडले. मोठी बहीण सोना घरी आलेली होती. राणी आल्याबरोबर रडू लागल्याने तिने तिची विचारपूस केला. तेव्हा राणीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. मात्र,बदनामीच्या भीतीने दोघी बहिणी गप्प राहिल्या. परंतु, ऑगस्ट रोजी रात्री उशीरा हा प्रकार मानलेल्या भावांना सांगितला. त्यांनंतर दोघी बहिणींनी आज गुरुवारी २ ऑगस्ट रोजी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here