Home इतर पाण्याच्या टाकीत आढळला मुलाचा सांगडा…!

पाण्याच्या टाकीत आढळला मुलाचा सांगडा…!

84
0

मराठवाडा साथी न्यूज

भिवंडी : भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समरूबाग येथील एका इमारतीच्या बेसमेंटमधील पाण्याच्या टाकीत चक्क एका वर्षीय बालकाचा सांगाडा आढळून आला आहे.त्यामुळे नजीकच्या परिसरात खळबळजक वातावरण निर्माण झाले आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन असे या मृत मुलाचे नाव असून २४ नोव्हेंबर रोजी तो बेपत्ता झाला होता.त्याच्या आईवडिलांनी २५ नोव्हें.रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र,त्यानंतर फारुकीचा मृतदेहच गुरुवारी(७ जाने.)रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत आढळून आला.

मुलाचा मृतदेह आदळून आल्यानंतर लगेच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली.सापडलेला मृतदेह बेपत्ता असलेल्या फारुकीचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.दरम्यान,तपासावेळी बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here