Home महाराष्ट्र MPSC परीक्षा होणार मार्चमध्ये

MPSC परीक्षा होणार मार्चमध्ये

445
0

मुंबई :कोरोनामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे वर्षभर रखडलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांबाबत आयोगाने अंतिम निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. शुक्रवारी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून(एसईबीसी) अर्ज केल्यास उमेदवारांना खुल्या किंवा आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्लूएस) प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे परीक्षा घेण्याचा तिढा सुटला असून तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा करून आयोगाने परीक्षांच्या तारखा ठरवल्या आहेत. त्याप्रमाणे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा व अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मार्च महिन्यात तर दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी …..
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवल्यास किंवा राज्य शासनाच्या आदेशात बदल झाल्यास आरक्षणाच्या निर्णयातही आयोगाकडून बदल केला जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घेणे बंधनकारक राहणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here