Home नांदेड नाळेश्वर-लिंबगाव रस्त्याची लवकरच दूरुस्ती–आमदार कल्याणकर

नाळेश्वर-लिंबगाव रस्त्याची लवकरच दूरुस्ती–आमदार कल्याणकर

658
0

नाळेश्वर : लिंबगाव रस्त्यावरील खडी, डांबर उखडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेवून कसरत करावी लागत आहे. जागो-जागी पडलेल्या खड्यांमळे लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. सुरळीत वाहतूकीसाठी लवकरच रस्त्याची दूरुस्ती करण्याचे अश्वासन देत नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अश्वासन दिले.
मराठवाडा साथी न्यूज

नांदेड, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नाळेश्वर- लिंबगाव रस्त्यावरील खडी, डांबर उखडल्याने दूरावस्था झाली आहे. जागो-जाग पडलेल्या मोठ, मोठ्या खड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागत आहे. परिसरातील नागरीकांतून जिव्हाळ्याच्या नाळेश्वर- लिंबगाव रस्ता दूरुस्तीची मागणी होत असल्याने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी रस्त्याच्या प्रत्यक्ष पहाणी करुन प्रशासनाला दूरुस्तीच्या सुचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे यंदा जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील खडी, डांबर उखडल्याने दूरावस्था झाली आहे.या शिवाय विविध मार्गाच्या नाल्यावरील नळकांडी पुलं वाहून गेले तर अनेक ठिकाणच्या पुलांचे कठडे ढासळले आहेत. त्यातच कोरोना महामारीच्या संकटामुळे दूरुस्तीसह नियोजीत कामे संथ गतिने सुरु आहेत.दळण-वळणासाठी अत्यंत महत्वाच्या मार्गाच्या दूरावस्थेमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघातील रस्त्यांच्या दूरुस्तीचा विषय विधानसभेत मांडून जास्तीत जास्ते निधी उपलब्ध करण्याचे अश्वासन आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिले. लिंबगाव- नाळेश्वर रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करताना नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. उत्तर मतदारसंघातील रस्ता दूरुस्तीचा प्रशासनाला विसर पडल्याने रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. लिंबगाव- नाळेश्वर रस्त्याच्या दूरुस्तीचा प्रशासनाला विसर पडल्याने परिसरतील गावखेड्यांच्या दळण-वळणासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता खड्यांनी माखल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अतिवृष्टीमुळे नाळेश्वर- लिंबगाव रस्त्याची दूरावस्था झाल्याने जागो- जागी पडलेल्या खड्यांमुळे वाहने खिळखिळी होत आहेत. जीव मुठीत घेऊन वाहतूकीची कसरत करणाऱ्या वाहनधारकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दरम्यान, केवळ रस्त्याच्या दूरावस्थेमुळे रुग्णांवर वेळेत उपचारास मुकावे लागत आहे. या शिवाय दैनंदिन कामासाठी शहराकडे ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार, वाहनधारकांना खड्ड्यातून मार्गक्रम करावा लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गळीत हंगाम सुरू असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा रस्त्या अभावी जीव भांड्यात पडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूकीसाठी वाहनधारक धजावत नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस वाहतूकी धास्ती घेतली आहे.
लिंबगाव- नाळेश्वर रस्ता नांदेड शहरासह राहटी,ढोकी, विष्णूपुरी मार्गे लोहा शहराला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूकीची कायम वर्दळ असल्याने परिसरातील नागरीकांनी दळण- वळणासाठी रस्ता दूरुस्तीची वारंवार प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून नागरीकांच्या मागणीला बगल मिळत असल्याने नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रत्यक्ष रस्ता पाहणी करुन सबंधी कंत्राटदारास समज देत तात्काळ रस्ता दूरुस्तीचे प्रशासनाला सुचना केल्या. या शिवाय अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील रस्त्यांच्या दूरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे अश्वासन या वेळी उपस्थित नागरीकांनी त्यांनी दिले. यावेळी परिसरातील नागरीक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here