Home इतर विवा ग्रुपवर ईडीची कारवाई…!

विवा ग्रुपवर ईडीची कारवाई…!

372
0

मराठवाडा साथी न्यूज

वसई : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर सक्तवसुली संचलनालयाने(ईडी)आज(२२ जाने.)सकाळी कारवाई केली आहे.ही कारवाई कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली होती.कारवाईदरम्यान,वसई- विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केल्या आहेत.

दरम्यान,प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक(पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण यांचे ठाकूर यांच्यासोबत आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.पीएमसी घोटाळ्यात ५ ते ६ कोटींचे मनीलॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आले असल्याचा संशय ईडी अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here