Home आरोग्य पहिल्या टप्प्यात “यांना ‘ मिळणार लस !

पहिल्या टप्प्यात “यांना ‘ मिळणार लस !

524
0

कोरोना लसीकरण : कोरोनावरील अधिकृत लसीकरणाला आजपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लसीकरणाचा शुभारंभ करणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी देशातील जवळपास 3 लाख आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. देशभरात असणाऱ्या 2934 केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे.

१०० लाभार्थ्यांना लस :
लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात जास्तीत जास्त 100 लाभार्थींना लस देण्याचं लक्ष्य असणार आहे. ज्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. निर्धारित आकड्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे आखणी करण्यात न आलेल्या मार्गानं लसीकरण न करण्याचे सक्तीचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

यांना मिळणार पहिल्या टप्प्यात लस :

  • भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल आणि तटरक्षक दलाच्या सेवेतील व्यक्ती.
  • बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी, एआर या सेवांमध्ये असणाऱ्या व्यक्ती.
  • आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती.
  • महानगरपालिका कर्मचारी.
  • सिव्हील डिफेन्सच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती.
  • राज्यस्तरीय पोलीस कर्मचारी.
  • कारागृह कर्मचारी.
  • कोविड 19 सेवेत असणारे Revenue officials
  • होम गार्ड

लसीकरणाच्या काही सूचना :

  • कोविडची ही लस फक्त 18 वर्षांवरील वयोगटात येणाऱ्यांना देण्यात येणार आहे.
  • लसींच्या मात्रेमध्ये किमान 14 दिवसांचं अंतर असणं अपेक्षित.
    -पहिल्या मात्रेच्या वेळी ज्या लसीचा वापर करण्यात आला आहे, त्याच (कंपनीच्या) लसीचा वापर दुसऱ्या लसीसाठी करावा.
  • परस्पर लसींमध्ये बदल करण्यास परवानगी नाही.

विशेष माहिती :
सध्या तरी गरोदर आणि स्तनपान महिलांसाठी या लसींची चाचणी घेण्यात आली नसल्यामुळे त्यांना लस न देण्याची सूचना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here