Home मुंबई भरती प्रक्रिया पार पडणार…

भरती प्रक्रिया पार पडणार…

60
0


मराठवाडा साथी न्यूज
पुणे: पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया होणार आहे. 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं ही भरती केली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण महिला अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरुनच अर्ज सबमिट करावा असं सांगितलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here