Home औरंगाबाद गोदावरी पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी

गोदावरी पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी

6438
0

भेंडाळा : गणेश विसर्जनास शुक्रवार दि 9 रोजी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील श्री रामेश्वर मंदिर जवळच्या गोदावरी पाण्यात करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले,तहसीलदार सतीश सोनी,पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी नियोजित विसर्जन ठिकाणी बुधवार दी.7 रोजीभेट देऊन पाहणी केली तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी श्री रामेश्वर मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, मोहसीन शेख, उपाध्यक्ष भाऊसाहेब गवळी, ग्रामपंचायत सदस्य गजानन गायकवाड, सचिन भोगे, संतोष बिरुटे, संतोष पंधुरे, तलाठी सतीश क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश हरणे, गणेश सोनवणे,सचिन तुपे,दशरथ बिरुटे आदी नागरिक उपस्थित होते.

यावेळी माहिती देतांना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले म्हणाले की,औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. यासाठी पोलीस प्रशासनाने निर्णय घेऊन गोदावरी पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी केली आहे.
वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे रामेश्वर मंदिर जवळ च्या गोदावरी नदी पात्रात गणेशमूर्ती विसर्जन स्थळ नियोजित केले आहे. या ठिकाणी शक्यतो छोटा हत्ती,पिकअप,टँक्ट्रर ,कार अशा छोट्या वाहनात गणपती मूर्ती आणावेत. मोठ्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा, रस्ता नसल्यामुळे आयशर, टेंमो, ट्रक, दहा टायर हायवा आदी वाहनात गणेशमूर्ती विसर्जनास आणण्यास बंदी आहे, असे सांगितले.

अनंत चतुर्थीच्या दिवशी शुक्रवारी ता.9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 पर्यन्त गणेश विसर्जनास परवानगी राहणार आहे. या दरम्यान पोलीस प्रशासन,तहसिल प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणार आहे. आणि स्थानिक जीवरक्षक दलाच्या युवकांना लाईफ जॉकेट देऊन मदत बचाव कार्यासाठी ते अहोरात्र तत्पर राहणार आहेत. नागरिक,गणेश भक्तांनी विसर्जनस्थळी नदी पाण्यात उतरू नयेत, आरती पूजा करून गणपती बोट वाल्यांच्या स्वाधीन करावे.ते पाण्यात जाऊन श्री मूर्तीचे विसर्जन करतील. सोबत लहान मुले आणू नयेत. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी केले.

असा आहे पोलीस बंदोबस्त

01 उपविभागीय पोलीस अधिकारी ,02 पोलीस निरीक्षक,10 सहाय्यक पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक ,70पोलीस कर्मचारी ,26 होमगार्ड, जीवरक्षक दल चे युवक 25आणि स्वयंसेवक 25 असा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

गोदावरी बचाव स्वच्छता अभियान अंतर्गत
रामेश्वर मंदिर देवस्थान समितीच्या वतीने पार्किंग सुविधा उपलब्ध करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून गणेश मंडळांनी,गणेश भक्तांनी या ठिकाणी निर्माल्य अनुच नयेत,अनवधानाने आणल्यास निर्माल्य संकलन करण्यासाठी एक वाहन उभे करन्यात येतील.त्यात निर्माल्य, हार,पूजेच्या वस्तू टाकाव्यात.असे आवाहन रामेश्वर मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाने केले आहे. तहसीलदार सतीश सोनी,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक संजय लोहकरे सर्व परिस्थिती वर लक्ष ठेवून राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here