Home मनोरंजन सगळ्यांचा बदला घेण्यासाठी येतेय. . ” दुर्गामती “

सगळ्यांचा बदला घेण्यासाठी येतेय. . ” दुर्गामती “

113
0

मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकरचा बहुचर्चित दुर्गामती: द मिथ सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या सिनेमाची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती. भूमि पेडणेकर पहिल्यांदाच आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा तेलूगु सिनेमा भागमती याचा रिमेक आहे. हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अमेझॉन प्राइमवर वर प्रदर्शित होणार आहे. ‘सगळ्यांचा बदला घेण्यासाठी दुर्गामती येतेय.’ अशी टीझलाइन यात भूमिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती. त्यामुळे अर्थातच हा सिनेमा सूडकथेवर आधारित आहे हा स्पष्ट होते.

काही दिवसांपूर्वी भूमिने या सिनेमाचं पोस्टर स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. या आधी सिनेमाचं नाव फक्त ‘दुर्गामती’ असं ठेवण्यात आलं होतं. आता ते बदलून दुर्गामती: द मिथ असं ठेवण्यात आलं आहे. मुळ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अनुष्का शेट्टी झळकली होती. यामध्ये अनुष्का शेट्टी आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here