Home आरोग्य परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स.

परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स.

675
0

सध्या शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा काळ आहे. त्यामुळे फक्त मुलच नाही तर त्यांचे पालकही परीक्षांचं फार टेन्शन घेतात. बऱ्याच मुलांची आणि पालकांची तक्रार असते की, अभ्यास तर करतो पण ऐन वेळी काही आठवत नाही. टेन्शन येतं. बरेच प्रयत्न करूनही लक्ष केंद्रित करू शकत नाही. अशा मुलांसाठी काही योगासनांच्या टिप्स आहेत ज्यामुळे मनातली एकाग्रता वाढून ताण कमी होतो.

१) ताडासन : ताडासन मुलांसाठी फार फायदेशीर असते. यामुळे मुलांचा पोश्चर सुधारतो. उंची वाढते. शिवाय मुलांचं मानसिक आरोग्यही नीट राहण्यास मदत
होते. भुजंगासनया आसनामुळे मुलांमध्ये समन्वय सुधारतो. शरीर लवचिक होतो. भुजंगासनाने मन एकाग्र व्हायला आणि बुद्धी तल्लख होण्यासाठी
मिळते. रोज सराव करायला हवा.

२) पर्वतासन : परीक्षेचा वेळ येताच मुलांची बाहेरची काम पूर्ण थांबतात. अशा स्थितीत शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे शरीर आणि मन चांगले कार्य
करण्यासाठी आणि तणावग्रस्त होऊ नये म्हणून व्यायाम आवश्यक आहे. पर्वतासनाने शरीर संतुलीत आणि योग्य प्रयत्न करण्यास मदत मिळते.

३) पद्मासन : पद्मासनाचा सराव केल्याने मन एकाग्र राहण्यास मदत मिळते. परीक्षेत मुलं सतत एका जागी बसून अभ्यास करतात. त्यांना पाठ दुखीची तक्रार
असते.अशावेळी पद्मासन केल्याने मुलांना पाठदुखीपासून आराम मिळेल, मन एकाग्र ह परीक्षेची अवास्तव भीत

४) पादहस्तासन : ज्या मुलांना जास्त ताण आणि अभ्यासाची चिंता असते आणि डोकेदुखी असते त्यांनी पादहस्तासन हे आसन करावे. त्यामुळे मन शांत राहण्यास
मदत मिळते.

५) ब्रीदिंग एक्ससाईज: ब्रीदिंग एक्ससाईजमुळे फुफ्फुसे मजबूत होतात. तसेच तणावाची पातळी देखील कमी होते. यासाठी तुम्ही श्वास घेण्याचे सोपे व्यायाम
करू
शकता. यासाठी तुम्ही डायफ्रामॅटिक ब्रीदिंग / बेली ब्रेथिंगचा प्रयत्न करू शकता .
१] पाठीवर झोपून खोल श्वास घेणे.
२] पोटावर झोपू खोल श्वास घेणे.
३] बसून खोल श्वास घेणे.
४] उभे राहून खोल श्वास घेणे.
यामुळे ताण कमी होतो व अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here