Home मनोरंजन सोशल मीडियावर बदलले आपले नाव

सोशल मीडियावर बदलले आपले नाव

252
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॅडमिंटन, मॉडेलिंग आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिका पदुकोण हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवुड मध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. दीपिकाने बॉलीवुड मध्ये पदार्पण केलेला शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका पदुकोणने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यामुळे तिच्या करिअरमधील हा महत्त्वाचा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. अलिकडेच या चित्रपटाला १३ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव बदलल्याचं पाहायला मिळालं.

‘ओम शांती ओम’ या चित्रपटात दीपिकाने ‘शांतीप्रिया’ ही भूमिका साकारली होती. त्यामुळे तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचं नाव बदलून शांतीप्रिया असं ठेवलं आहे. सोबतच तिने डिस्प्ले इमेजदेखील बदलल्याचे पाहायला मिळत आहे. डिस्प्ले इमेजवर तिने ओम शांती ओम चित्रपटातील शाहरुख आणि तिचा फोटो लावला आहे.

दरम्यान, ‘ओम शांती ओम’नंतर दीपिकाच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. दीपिका आज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये पिकू, मस्तानी,राणी पद्मावती,मीनाम्मा,नैना तिच्या यासर्व भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. सध्या ड्रग्स प्रकरणी दीपिकाच नाव चर्चेत आहे. माञ यावर अद्याप दीपिकाने आपली कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र सोमवारी दीपिकाने सोशल मीडिया अकाऊंटचं नाव ट्रेंड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here