Home बीड बजरंगाची कमाल..!केज तालुक्यात राष्ट्रवादीची धमाल

बजरंगाची कमाल..!केज तालुक्यात राष्ट्रवादीची धमाल

815
0

केज

केज तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.यात बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक 14 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. विडा गटातील येवता तसेच नांदुरघाट गटातील वाघेबाभुळगाव ग्रामपंचायती सर्वात मोठ्या असून त्या ठिकाणी निवडणुकामध्ये सत्ता परिवर्तन करण्यात बजरंग सोनवणे यांना फार मोठे यश आले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तालुक्यात राष्ट्रवादीचा गझर पुन्हा घुमला आहे. सुरूवातीपासून केज तालुक्यातील ग्रामपंचायती वर बजरंगाचे वर्चस्व राहिलेले आहे.
सद्यस्थितीच्या निवडणुकांमध्ये तरूणांना तसेच गावातील अनुभवी व्यक्तींना एकत्रित समन्वय साधून या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले आहे.
निवणुकीच्या सुरूवातीलाच बजरंगाचा मास्टरस्ट्रोकने म्हणून घाटेवाडी, मोटेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली
वरील मोठ्या ग्रामपंचायती बरोबरच पाथरा,काशिदवाडी,मुंडेवाडी,सुकळी,भोपळा,रामेश्वरवाडी,बानेगाव,कोरडेवाडी,लाखा,बोबडेवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाने एक हाती सत्ता मिळविता आली.तसेच विडा,गप्पेवाडी/नामेवाडी,पैठण यासारख्या ग्रामपंचायती सुध्दा कोणालाही एक हाती सत्ता मिळवता आली नाही. त्यामध्ये सुध्दा संमिश्र वाटा बजरंग सोनवणे यांचा आहे. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा ध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी भ्रमणध्वनीव्दारे सर्व विजयी उमेदवारांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here