Home अर्थकारण अनिल अंबानींची तीन बँक खाती “फ्रॉड “?

अनिल अंबानींची तीन बँक खाती “फ्रॉड “?

456
0

CBI चौकशी होण्याची श्यक्यता .

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती ‘फ्रॉड खाती’ म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. या तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिक अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण एसबीआयकडून या प्रकरणासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ शकते.

सुत्रांच्या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत.त्यामुळे अनिल अंबानीवर CBI चौकशी होण्याची श्यक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी या कारणामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची श्यक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here