Home अंबाजोगाई नकली नोटा चालवताना एकास पकडले एक फरार अंबाजोगाई पोलिसांची कामगिरी

नकली नोटा चालवताना एकास पकडले एक फरार अंबाजोगाई पोलिसांची कामगिरी

हजारो रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात

94
0

अंबाजोगाई : कमी पैशांमध्ये नकली नोटा विकत घेऊन (किंवा प्रिंटर मशीनवर छापुन) हे गर्दीच्या ठिकाणी चालून नोटाचा काळाबाजार करणाऱ्या दोन तरुणा पैकी एकाच्या कारसह पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या मौजे चनई येथील दोन तरुण 50 व दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बाजारामध्ये चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार अंबाजोगाई पोलिसांनी सदरील युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आज रात्री सात वाजता दोघे तरुण स्विफ्ट डिझायर गाडी सह शाहू महाराज चौक (दवाखाना) येथे बनावट नोटा चालवत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पोलिसांनी यादोघांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चौधरी नामक एक तरुण पोलिसांच्या हातात सापडला असून दुसरा बनावट नोटा चालवणारा फरार झाला आहे . सध्या या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दहिफळे यांनी दैनिक मराठवाडा साथी शी बोलताना दिली.
लवकरच बनावट नोटाचा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व संपूर्ण टोळीच्या मुसक्या बांधण्यात येतील असे त्यांनी म्हटले आहे.

फरार आरोपीने विविध प्रकारच्या लक्की ड्राँ द्वारे व कमी गुंतवणूक जादा नफा, अनेकांना जादा पैशाचे आमिश दाखवून लाखो रुपयांना गंडवल्याची चर्चा सोशल मिडियावर चालू आहे.
भां द वी कलम 489 ब, क नुसार आरोपीवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास ए पी आय दहिफळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here