Home क्रीडा ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये : भारतीय महिला संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये 5 धावांनी पराभूत

ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये : भारतीय महिला संघ टी-20 वर्ल्डकपमध्ये 5 धावांनी पराभूत

301
0

केपटाऊन:ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य सामन्यामध्ये हरमनप्रीत काैरच्या भारतीय महिला संघाचा ५ धावांनी पराभव केला व मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना गुरुवारी महिलांच्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सातव्यांदा दाखल झाला आहे . सुमार क्षेत्ररक्षण व हरमनप्रीत काैर रण आउट झाल्याने भारताचा परभाव झाला. ऑस्ट्रेयाने सातव्यांदा फायनल गाठली. बेथ मुनी ५४ आणि लॅनिंगच्या नाबाद ४९ शानदार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गड्यांच्या माेबदल्यात भारतासमाेर विजयासाठी १७३ धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावत १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत काैर ५२, जेमिमा राॅड्रिग्ज ४३ आणि दीप्ती शर्माने नाबाद २०, एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. पराभवाने भारतीय संघाला मागार घ्यावा लागला . यामुळे भारतीय महिला संघाचे पहिल्यांदा चॅम्पियन हाेण्याचे स्वप्नभंग झाले आहे . येत्या रविवारी वर्ल्डकपची फायनल हाेणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फायनल गाठली. या टीमचा अंतिम सामना आता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाशी हाेणार आहे कर्णधार हरमनप्रीत काैरचे अर्धशतक व्यर्थ ठरले आहे .ऑलराउंडर दीप्ती व राधाचे २ विकेट भारतीय संघाला फायनलचे तिकीट मिळवून देण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत काैर (५२), शिखा पांडे, राधा यादव आणि ऑलराउंडर दीप्ती शर्माने प्रचंड मेहनत केली. मात्र, त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. यादरम्यान हरमनप्रीतने उपांत्य लढतीत ऑ‌स्ट्रेलिया संघाविरुद्ध शानदार अर्धशतक साजरे केले.इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आता वर्ल्डकपची फायनल गाठण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे या दाेन्ही संघांमध्ये लढत हाेणार असल्याचे दिसून येत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ शुक्रवारी समाेरासमाेर असतील. पाकवर माेठा विजय संपादन करत इंग्लंड संघाला अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित करता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here