Home मुंबई सोने आजच खरेदी करा ; सोन्याचा भाव ३०५ ₹ रुपयांनी घसरला

सोने आजच खरेदी करा ; सोन्याचा भाव ३०५ ₹ रुपयांनी घसरला

248
0


तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार परदेशातील मौल्यवान धातूंच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव ३०५ ₹ रुपयांनी घसरुन प्रति १० ग्रॅमचा ५६,०३४ रुपये आहे. मागील काही दिवसात सोने ५६,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​स्थिरावले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशातील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कोणताही बदलदिसून आलेला नाही.
त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज म्हणजेच शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी सराफा बाजारातील सोने-चांदीची किंमत प्रति १० ग्रॅम ३०५ रुपयांनी खाली आल्या होत्या. दिल्लीत सोन्याचा भाव ५६,०३५ रुपये आहे. तर या तुलनेत मुंबईत २४ कॅरेट सोने ५६,४१० रुपये तर २२ कॅरेट सोने ५३,२६० रुपये असा दरयाप्रमाणे मुंबईत सोने विक्री चालू आहे.
Bank Bazaar.com नुसार, मध्य प्रदेशातील सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. म्हणजेच, 22 कॅरेट सोने ५२,९३० रुपये प्रति १० ग्रॅम होते, ते आज त्याच किंमतीला विकले जाईल. दुसरीकडे, जर आपण 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, काल जे सोने ५५,५८० रुपये प्रति १० ग्रॅम होते, ते आज त्याच दराने विकले जाईल. गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव स्थिर असल्याचे दिसते .
त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत घसरण होऊन मध्य प्रदेशच्या सराफा बाजारात गुरुवारी ७२,००० रुपये प्रति किलो चांदीची विक्री झाली तर, आज ७१,५०० रुपये किलो दराने विकली जाईल. म्हणजेच एकूणच चांदीच्या दरात किलोमागे 500 रुपयांची घटझाल्याचे जाणवते .
भारतातील सोने -चांदीची किंमत फ्युचर्स मार्केट ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, हे सेंट्रल प्राइज आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री केली जाते.
२४ कॅरेट सोने ९९. ९ टक्के शुद्ध आहे आणि २२ कॅरेट सोने सुमारे ९१ टक्के शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नसल्याने दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने वापरले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here