Home पुणे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

483
0

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन .प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे वयाच्या ८९वर्षी पुण्यात निधन झाले.
शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यामुळे त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९:३०च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.आज सायंकाळी ६ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहे . प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शेखावत यांना१९७२ मध्ये मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर १९९१-१९९२होते. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून १९८५-१९९० या कालावधीसाठी निवडून आले होते. १९८५ च्या लढतीत त्यांनी त्यांची ठेव गमावली होती. अमरावतीचे प्रथम महापौर डॉ. देवीसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान होते .१९९२ मध्ये ते अमरावती महापालिकेचे प्रथम महापौर होते ,अमरावती विधानसभा मतदार संघाचे आमदार होते तसेच १९८५ ते १९९० मध्ये अमरावती येथील विद्याभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमरावती शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते व १९९० ते १९९४ मध्ये त्यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सेलुबाजार येथील महाविद्यालयात डॉ. देवीसिंह शेखावत यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here