Home इतर भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक;एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी…!

भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक;एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी…!

308
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास जवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याची घटना रात्री घडली.या अपघातात मोटारसायकल वरील एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात नामदेव मस्के(वय ४०/रा.गोलंग्री)यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून वाल्मीक खवले(वय ३५/ रा.कानडी घाट)हे गंभीर जखमी झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की ,नामदेव आणि वाल्मिक हे दोघेही मोटारसायकलने(क्र.एमएच-20 सीके-9382)चौसाळा येथे येत असताना सोलापूर महामार्गावरील बायपासवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र.एचआर-56 बी-2344)ने मोटारसायकल ला जोरात धडक दिली.

दरम्यान,राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातात जखमी झालेल्या वाल्मिक खवले यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here