Home क्राइम महिला सरपंचाची हत्या..

महिला सरपंचाची हत्या..

212
0


मराठवाडा साथी न्यूज
गोड्डा: झारखंडच्या गोड्डा येथे एका महिला सरपंचाची गळा चिरून हत्या झाली आहे चंपा चौडे (वय ५६) असे महिला सरपंचाचे नाव आहे बोआरीजोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहला गावात ही खळबळजनक घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसडीपीओ के. के. सिंह हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाजवळ टॅब, बॅटरी आदी वस्तू होत्या. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे


मृत महिलेचा पती नीमू मरांडी यांच्या मृत्यूनंतर ती लहान बहिणीच्या घरी राहत होती. जवळपास १० ते १२ वर्षांपासून ती आपली बहीण मरांगमय चौडे हिच्या घरी राहत होती. सरपंचपदावरून तिचा वाद सावत्र मुलासोबत सुरू होता, अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. या हत्येच्या घटनेवरून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महिला सरपंचाची हत्या होणे ही गंभीर बाब आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच मारेकऱ्यांना लवकर अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here