Home औरंगाबाद आणि ठाकरे केंद्रेकरांना ‘ओरडले’…!

आणि ठाकरे केंद्रेकरांना ‘ओरडले’…!

569
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद शहरामध्ये दौऱ्यावर आले होते.दरम्यान,भाषण सुरु असतांना कोरोनाचे संकट टळलेले नाही, हे सांगतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मनापासून तळमळीने बोलतो आहे. आता सगळे उघडले असले तरी मास्क खाली करू नका. आज मी विमानतळावर केंद्रेकरांना (विभागीय आयुक्त) ओरडलो. दोन दिवसांपुर्वी हा माणुस तापाने फणफणला होता. त्यांना फोन करून मी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी फोनवरून टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले. आता विमानतळावर स्वागताला त्यांना पाहून मी ओरडलोच. तुम्ही लोकांना ओरडता, मी तुम्हाला ओरडलो, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांना प्रशासकिय अधिकाऱ्यांची किती काळजी आहे? हे जाणवत होते. त्यामुळे मास्क खाली करू नका आणि त्यापेक्षा बिकट संकट येणार नाही, याची मला खात्री असल्याचेही ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here