Home अपघात बातमी तब्बल ८ ते १० सिलिंडरचा स्फोट, ६ कारखान्यांचे मोठे नुकसान

तब्बल ८ ते १० सिलिंडरचा स्फोट, ६ कारखान्यांचे मोठे नुकसान

247
0

पुणे:पुण्यातील धायरी भागात असलेल्या एका पेंट फॅक्टरीला मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. जवळपासच्या कारखान्यांमध्येही ही आग पसरली आणि जवळपास ८ ते १० सिलिंडरचा स्फोट झाला.पेंट फॅक्टरीच्या आजुबाजूच्या ६ कारखान्यांमध्येही ही आग पसरल्याने या कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.धायरी परिसरातील गणेश नगर गल्ली क्रमांक २२ मध्ये रंग निर्मितीचा कारखाना आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या ६ कारखान्यांचेही मोठे नुकसान झाले. तर, जवळपास ८ ते १० सिलिंडरचे स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यामध्ये अनेक वाहनेही जाळली आहेत.आगीची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या शर्थीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसही घटनास्थळी हजर आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंट फॅक्टरीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here