Home क्राइम घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक

घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक

307
0

नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाणे हद्दीमध्ये १ मार्चला रामदास पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे रोख रक्कम व सोन्याचे गंठण, असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी केली होता. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद होता. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तपासाची चक्रे फिरत होती. कक्ष ३ गुन्हे शाखेकडून घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता. दरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ठिकठिकाणचा डंपडाटा घेवून केलेल्या तांत्रिक तपासामधून मिळालेल्या माहितीवरून कक्ष ३ गुन्हे शाखेच्या तपास पथकाने मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर या परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कक्ष ३ गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सुमित भगवान शेळके (वय २४ रा. गांधीपाडा अलिबाग, सध्या रा. लक्ष्मी कसबे चाळ, कुर्ला पश्चीम, मुंबई) आणि श्रीनाथ सदाशिव वाघमारे (वय २५ रा. जि. सोलापूर सध्या राहणार शहीद भगतसिंग नगर, वडाळा पुर्व, मुंबई) यांना १० तारखेला अटक केली. अटक करून तपास केला असता सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. नमुद आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here