Home इतर कुकरमुळे झाला सत्यानाश…!

कुकरमुळे झाला सत्यानाश…!

72
0

मराठवाडा साथी न्यूज

डोंबिवली : ठाकुर्ली स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा भयानक स्फोट झाला आहे.या स्फोटादरम्यान कलय्या स्वामी सेलवन(वय ४०)हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे.मालकावर सध्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

डोंबिवली जवळच्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरातील ‘हॉटेल सौभाग्य न्यू किचन’ या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, तसेच पार्सलची सुविधा देखील या हॉटेलमधून दिली जाते. मंगळवारी(१२ जाने.)सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास कलय्या स्वामी हे स्वतः चिकन हंडीसाठी लागणारे मांस एका ऍल्युमिनियमच्या कुकरमध्ये टाकून शिजवत होते. मात्र काही वेळानं या कुकरचा कानठळ्या बसतील एवढ्या जोरात स्फोट झाला. या स्फोटात कुकरच्या उडालेल्या झाकणाने कलय्या स्वामी गंभीर जखमी झाले.त्यानंतर बेशुद्धावस्थेत पडलेल्या कलय्या स्वामी यांना स्थानिकांनी त्वरित शिवम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान,पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी कलय्या स्वामी आणि पत्नी मयुरी सेलवन (वय ३५) यांचा जाब नोंदवून घेतला आहे.या प्रकरणी संपूर्ण तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप एगडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here