Home इतर गॅस विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गॅस विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

6
0

मराठवाडा साथी न्यूज
आन्वा :
भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरातील गॅस सिलिंडर ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असल्याने गॅससिलिंडर धारक पुरते वैतागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांची लुट थांबविण्याची मागणी ग्राहकांनी िजल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.


सततच्या महागाईने महिलांना घरातील महिन्याचे बजेट जुळवता जुळवता तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईने सळो की पळो करून सोडले आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र शासनाने आणि संबंधित गॅससिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा गॅस सिलिंडर वितरक ४० ते ५० रुपये जास्त घेत असून आर्थिक लुबाडणूक होत असल्याने ग्राहक कमालीचे त्रासले आहेत.


गॅस वितरकांकडून ग्राहकांना सिलिंडर घरपोच देण्यासाठी ६४० किंवा ६५० रुपये सर्रास घेतले जात आहेत. एखाद्या ग्राहकाने आगाऊ रक्कम देण्यास मनाई केली, तर त्याला सिलिंडर दिला जात नाही. त्यामुळे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत.पावतीपेक्षा जास्त किमत मागून ग्राहकांना लुटण्याचा गोरखधंदा सध्या गॅस वितरकांनी सुरू केल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

किमतीपेंक्षा जादा पैशाची वसूली
भोकरदन येथील एजन्सीने ग्राहकांकडून पावती वर जेवढी रक्कम आहे, तेवढीच घेणे हिताचे व व्यवहार्य आहे. मात्र, एजन्सीचे कर्मचारी घरपोच सिलिंडर पोहचविण्या करिता आले असता किमतीपेक्षा जास्त म्हणजे ६४० ते ६५० रुपयांची उघडपणे मागणी करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात २६ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले असून या गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी माहिती गणेश साबळे यांनी केली आहेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here